Breaking News

राज्यातील 92 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांंचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. 8) जाहीर केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
या ठिकाणी होणार निवडणुका
अ वर्ग नगर परिषदा-भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद; ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी; क वर्ग नगरपालिका-चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा; नगरपंचायती-नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply