पेण ः प्रतिनिधी
नासा, जपान, रशिया, इस्त्रो, चायना, युरोपियन देश वगैरेंशी संलग्न असणार्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील सात, तर कल्याणमधील एकाची युवकाची निवड झाली आहे. 1951 साली स्थापन झालेल्या या संस्थेची ही 70वी परिषद असून आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची अथवा संस्थेची निवड या परिषदेसाठी झाली नव्हती, मात्र ऑक्टोबर 2019मध्ये होणार्या या परिषदेत सादरीकरण करण्यास 86 देशांमधून 4320 शोध निबंधांमध्ये भारतातील विशेषकरून महाराष्ट्रातील रायगडमधील सात, तर कल्याणमधील एका विद्यार्थ्याला या परिषदेसाठी पहिल्यांदाच खअउने निमंत्रित केले आहे.
सातही विद्यार्थी इम्पेरियल सायंटिफिक असोसिएशन संस्थेशी संबंधित असून त्यांना या परिषदेत दोन शोधनिबंध सादरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. हर्षवर्धन देशपांडे (पेण), प्रज्ञेश म्हात्रे (पेण), विराज ठाकूर (पेण), कृपाळ दाभाडे (पेण), भक्ती मिठागरे, नमस्वी पाटील (अलिबाग), वृषाली पालांडे (खोपोली) व रिकेश कुरकुरे (कल्याण) असे आठ विद्यार्थी असून या परिषदेत त्यांना दोन शोधनिबंध सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या शोध निबंधात टायटन या शनीच्या चंद्रासारख्या उपग्रहावरील लहरी हवामानाचा अभ्यास तसेच ‘कसिनी’ उपग्रहाने पाठवलेल्या फोटोवरून टायटन या पृथ्वीशी साम्य असलेल्या, पण मिथेन व इथेनने भरलेल्या नद्या, समुद्र, डोंगर असलेल्या उणे 180 तापमानाचा उपग्रह ज्यावर पोहचायला कसिनी अवकाश यानाला सात वर्षे लागली, पृथ्वीबाहेर मानवी वसाहत राहू शकेल अशा ग्रहांच्या शोधमोहिमेतील टायटन या शनीच्या 52व्या चंद्राच्या पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास करून पुढची मोहीम आखण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था प्रयत्नशील आहे.
दुसर्या शोधनिबंधात पृथ्वी व मंगळासह इतर ग्रहांच्या प्रदूषित वातावरणाचे पृथक्करण करून त्यात मानवी शरीर कसे टिकवावे याचा समावेश आहे. दोन्ही शोधनिबंध इम्पेरियल सायंटिफिक असोसिएशनतर्फे सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे इस्त्रोच्या वैज्ञानिकांनाही अजून अशी कामगिरी करता आली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंधांची दखल घेणे म्हणजे इंजिनिअर मेडिकल क्षेत्रातील डिग्रीपेक्षाही मोठा बहुमान असतो, पण यातच आपण कमी पडतो म्हणून आयआयटी ही भारतातील
सर्वोत्तम संस्था जगात पहिल्या 100मध्येही नाही याची खंतदेखील आहे, मात्र अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेसाठी आपल्या देशातील आठ जणांची पहिल्यांदाच निवड होणे हेदेखील अभिमानास्पद आहे.
जागतिक स्तरावर रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव झळकवणार्या या विद्यार्थ्यांना 21 ते 25 ऑक्टोबरदरम्यान अमेरिकेत होणार्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन करण्यास जाण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये खर्च येणार आहे, मात्र परिषदेत देशाचे नाव उज्ज्वल होणेही महत्त्वाचे असल्याने या आठही विद्यार्थ्यांना सढळ हाताने ज्यांना कुणाला मदत करायची असेल, त्यांनी ढशीळश्र डलळशपींळषळल ईीेलळरींळेप सुगम जे. ठाकूर 9820738229, प्रज्ञेश म्हात्रे, 7276594923 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.