मोहोपाडा : प्रतिनिधी
वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शुक्रवारी (दि. 8) धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील 35 दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 2060 रुपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले.
सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, मा. उपसरपंच विलास माळी, सदस्य-गुरुनाथ माळी, अशोक गायकर, जगन्नाथ चव्हाण, ज्ञानेश्वर माळी, मनोज पवार आणि दिव्यांग पुनर्वसन संस्था खालापूरचे अध्यक्ष मंगेश रामदास पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. धनादेश मिळाल्याने दिव्यांगांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.