पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील खारपाडा येथील वंश संजय घरत याने आळंदी (पुणे) येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट किक बॉक्सिंग या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यासोबतच त्याने खारपाड्यासह पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे. वंश घरत हा रायगड जिल्हा परिषदेच्या खारपाडा येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक रवींद्र म्हात्रे आणि प्रथमेश मोकल यांच्या किक बॉक्सिंगचे मार्गदर्शन लाभले. रौप्यपदक पटकाविल्याबद्दल वंशचे अभिनंदन होत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू विविध स्पर्धांत चमकत आहेत.