खालापूर ः प्रतिनिधी पावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धामणी येथील वळण बंधारा पूर्वीच भरल्याने खालापूर तालुक्यातील तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे पुढील काळात भेडसावणारी पाणी समस्या सुटली आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …