खारघर : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बंद झालेली महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरू झालेली आहेत. त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी (दि. 30) यशस्वीपणे झाले.
या शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी यांच्या हस्ते झाले. या वेळी आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण सावे, डिएलएलई विभागप्रमुख प्रा. महेश धायगुडे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे डॉ. वर्तिका कोटनाला व त्याचे सहकारी उपस्थित होते.
या लसीकरण माहिमेच्या यशस्वितेसाठी प्रा. रोहित पाटील, प्रा. राहुल कांबळे, प्रा. महादेव चव्हाण आणि प्रा. भरत सोलंकी याच्यासह शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी कोरोना प्रार्दुभाव लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊन कोरोना प्रार्दुभाव लसीकरणाचा लाभ घेतला. प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनेत भाग घेतला.
या विशेष लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.