Breaking News

पनवेलमध्ये राज्यस्तरीय कुंग-फू स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्पर्धकांना प्रोत्साहित

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात सातव्या महाराष्ट्र कुंग-फू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी (दि. 31) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहित केले. कुंग-फू स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबईच्या वतीने आणि महाराष्ट्र कुंग-फू स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने सातव्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, ठाणे, रायगड, नांदेड, सांगली, नाशिकसह इतर जिल्ह्यांतील सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा 6, 9, 11, 14, 17, 19, 25 वर्षाखालील आणि 25 वर्षावरील खुल्या गटात खेळवण्यात आली. या स्पर्धेला ऑल इंडिया कुंग-फू फेडरेशनचे अध्यक्ष सी. एल. लामा, कुंग-फू स्पोर्ट्स महाराष्ट्र असोसिएशनचे गेनेराल सेक्रेटरी विवेक द्विवेदी, अध्यक्ष सुनील तावडे, सुरज नाईक, ओमकार पवाड, अजय बुंदेला, विश्वास ठाकर, योगेश वेताल, कमल कोठारी, मंगेश पाटील, सचिन पाटील, संदीप कुंजीर, जयदीप तांडेल, सुनील खंडागळे, उमेश कोल्हे, वृषभ जाधव, लीना वेंगुर्लेकर, अजिंक्य लव्हे, इरसार शेख, राजीव पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply