Breaking News

कर्जत आगरी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी गुणवंतांचे कौतुक करून करिअरविषयी मार्गदर्शन केले. नेरळ-कोल्हारे येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष व जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, संघटनेचे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव, एकनाथ धुळे, नागो गवळी, नामदेव गोमारे, भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, अरुण कराळे, शिवाजी खारिक, राजेश भगत, संतोष जामघरे, भूषण पेमारे, बबिता शेळके, भगवान धुळे आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कर्जत तालुक्याला शैक्षणिक इतिहास असून प्रतिभावंत तरुण घडत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास उच्च अधिकारी या तालुक्यातून पुढे येऊ शकतात, असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.  कर्जत तालुक्यातून दहावीमध्ये प्रथम आलेली आगरी समाजातील पूर्वा तुकाराम मोरगे तसेच दहावी आणि बारावीमध्ये प्रत्येक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. तालुक्यात दहावी आणि बारावीमध्ये 80टक्के हून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला गेला. याशिवाय समाजातील मुलांनी विविध क्षेत्रांत तसेच स्पर्धांमध्ये यश संपादन करून नाव उंचावले आहे त्यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply