Breaking News

‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती
  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. या वेळी त्यांनी मयुरेश नेतकर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. या अंतर्गत 800 महाविद्यालये संलग्न आहेत. सदस्यत्त्वाचा पाच वर्षांचा कालावधी असलेल्या सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ अंतर्गत निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो. राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक केली जाते. त्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नऊ जणांची सिनेट सदस्यपदी नेमणूक केली आहे. त्यामध्ये पनवेलचे मयुरेश नेतकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
मयुरेश नेतकर हे गेल्या 15 वर्षांपासून विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतात, पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन समस्या सोडविण्यासाठी धडपडत असतात. महाविद्यालयीन समस्या सोडवताना प्रसंगी त्यांनी अनेक आंदोलने उभारली निदर्शने केली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. विद्यार्थी व युवकांना संघटीत करत असताना शैक्षणिक समस्या अधोरेखित करण्याचे काम त्यांनी केले आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्ती झाल्याबद्दल मयुरेश नेतकर यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply