पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील गुरवआळी व होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
पालीतील गुरवआळी व होळीचा माळ चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती पाली व सामाजिक कार्यकर्ते ओमकार प्रमोद खोडागळे तसेच गुरव समाजाने नगरपंचायत प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार सोमवारी या चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. तहसीलदार दिलीप रायन्नावर, माजी उपसरपंच संगीता खोडागळे व नगरसेविका जुईली ठोंबरे यांच्यासह अनेक महिलांच्या हस्ते नामफलकाचे पूजन करण्यात आले.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, तालुका युवासेना अधिकारी किरण पिंपळे, नगरसेवक सुधाकर मोरे, पराग मेहता, सुधीर भालेराव, सुलतान बेनसेकर, विक्रांत चौधरी, निलेश धारिया, संदेश सोनकर आदीसह नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उमेश मढवी, विद्देश आचार्य, नागेश आंबेकर, शुभम मिसळ, श्रीकांत ठोंबरे, सूरज गुप्ता, स्वराज मेहता यांनी विशेष मेहनत घेतली.