पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदा कॉलनीत खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर आयोजित या महोत्सवाला शनिवारी (दि. 19) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयोजक उपमहापौर सीताताई पाटील आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. सातत्याने हा महोत्सव भरविला जात असल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक केले. दरम्यान, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, ओबीसी सेलचे रामनाथ पाटील, मोतीलाल कोळी, गोपीनाथ मुंडे, भीमराव पोवार, अंकुश खेडकर, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. मान्यवरांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सीता पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. खांदा वसाहतीची लोकसंख्या कमालीची वाढली आहे. येथील रहिवाशांची मनोरंजन, कला आणि सांस्कृतिक गरज भागविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याला वर्षागणिक नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे पहावयास मिळत आहे.
Check Also
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …