लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी
बुद्धीचे देवता गजाननाचे घरोघरी आगमन झाले आहेत. त्यानिमीत्त उलवे नोड येथे उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून उलवे नोड सेक्टर 17 येथे उलवेचा विघ्नहर्ता विराजमान झाला आहे. या गणरायाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले. दरम्यान या वेळी संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या वेळी गव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच विजय घरत, सदस्या योगिता भगत, भारती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अवधेश मेहतो, भाऊशेठ भोईर, सुजाता पाटील, सुहास भगत, शेखर काशिद, सचिन आवटे, पल्लवी सुर्वे, अनिल सनस, वांची एस., गुड्डू कनोजिया, अमित झा, किरण लोहकरे, बिरुदेव गडदे, पांडुरंग विभुते, सुजाता पाटील, अल्गू कनोजिया, ओमकार कदम, मोहन गाडे, मनोज सिंग, सागर रंधवे, अविनाश कजबजे, नरेंद्रनाथ तिवारी, सचिव मनोज कुमार मोर्या, अॅडव्होकेट सुनील मोर्या, विकास सिंग, राजकुमार सिंग, गौतम कुमार, सुभाष पांडे, संदीप सिन्हा, जोहारलाल चौहान, संजीव कुमार ठाकुर, संदीप कुमार, मिसा महतो, मंजू मोर्या,रश्मी गौतम, अंजू मोर्या, सुमन सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी भारती सामाजिक संस्थेच्या वतीने उलवेनोड सेक्टर 17 येथील हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या गायन, फॅशन, नृत्य तसेच लाईन क्लबच्या वतीने आयोजीत हस्ताक्षर स्पर्धेला भेट देत विजेत्यांना बक्षीस देउन त्यांचा गुणगौरव केला.