Breaking News

रायगड जिल्हा असोसिएशनतर्फे कबड्डी स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे प्रौढ गट पुरुष, महिला, कुमार गट मुले-मुली, किशोर गट मुले-मुली कबड्डी स्पर्धांना या हंगामात खर्‍या अर्थाने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध गटांची स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे भालचंद्र स्पोर्ट्सच्या संयोजनाखाली 19 व 22 नोव्हेंबर रोजी कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे निखिल मयेकर मित्र मंडळाच्या संयोजनाखाली 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील कणे येथे साहिल इंटरप्राईजेस व ग्रामस्थ मंडळाच्या संयोजनाखाली 4 व 5 डिसेंबर रोजी किशोर व किशोरी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतून निवडले जाणारे पुरुष, महिला, कुमार गट, किशोर गट संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या राज्य स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply