पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे.
14 वर्षे वयोगटातील अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मुलांच्या संघाने सामना जिंकून विजेतेपद पटकाविले.
गव्हाण संघ केवळ एक गुणाने पराभूत झाला. या संघाकडून कर्णधार सर्वेश कोळी, नैतिक म्हात्रे, कृतीक म्हात्रे व राहुल उलवेकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळी करून एकूण चार सामने खेळले आणि अंतिम सामन्यात उपविजेते होण्याचा मान मिळविला.
गव्हाण संघातील खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक व प्रभारी प्राचार्य प्रमोद मंडले यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे अभिनंदन होत आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …