पनवेल : वार्ताहर
प्रभाग 18 मधील ड्रेनेज परिसरातील धोकादायक असलेला खड्डा तत्परतेने नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पालिका कर्मचार्यांकडून बुजवून घेतला. स्वामी नित्यानंद मार्ग ते टिळक रोड या रस्त्यावरील असलेल्या ड्रेनेजवरील काँक्रीट स्लॅब तुटून खड्डा पडला होता. काही जागरूक नागरिकांनी या खड्डयांमुळे कोणती ही दुर्घटना होऊ नये म्हणून खड्याच्या बाजूला मोठी दगडं लावून ठेवली आणि याची माहिती नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली. विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकार्यांशी बोलून खड्डा बुजवण्यास सांगितले. त्यानुसा खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. विक्रांत पाटील माझा प्रभाग, माझी जबाबदारी या अनुषंगाने नागरिकांच्या समस्या नेहमी तत्परतेने सोडवतात. याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.