Breaking News

संयुक्त राष्ट्रांकडून वर्ष 2023 ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ जाहीर

मुरूड ः प्रतिनिधी

भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. तृणधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे. या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. तृणधान्यात भात,ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर), नाचणी या पिकांचा समावेश होतो. तृणधान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे या पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर अल्प प्रमाणात होतो. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती ‘पौष्टिक तृणधान्य’ म्हणून ओळखली जातात आणि पचायला हलकी असतात. धान्याच्या पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीतही होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्याचे पीक घेता येते. तृणधान्य पिके वातावरणातील ताण सहन करणारे तसेच कीड व रोगांना प्रतिकार करतात. तेव्हा शेतकरी वर्गानेही तृणधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवावे, तसेच नागरिकांनी तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply