Breaking News

बैलगाडी शर्यतीबाबत गांभीर्याने विचार करा

धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनार्‍यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकात घुसल्याने भिषण अपघात झाला. यात दोन जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. या पुर्वील अलिबाग, मुरुड आणि कर्जत मध्ये अशाच घटना घडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात होऊन एकट्या अलिबाग तालुक्यात तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यती पुन्हा वादात सापडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीत जिल्ह्यात दुर्घटना घडत आहेत. चार जणांचा जीव आत्ता पर्यंत गेला आहे. जीवघेण्या बैलगाडी शर्यती आयोजनाबाबत सर्वांनी गांभिर्याने विचार करून निर्णय घ्यायला हवा.

बैलगाडी स्पर्धेत  बैलांना होणार्‍या अमानुष मारहाणीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये बैलगाडी स्पर्धांवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्ये सर्वोच्च न्ययालयाने बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाला सशर्त परवानगी दिली होती. बैलगाडी शर्यत आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु ती घेतली जात नाही. राज्यसरकारने स्पर्धांच्या आयोजनाबाबत नियम घालून दिले होते. त्याचे पालन केले जात नाही. स्पर्धेच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे बैलगाडी शिर्यातीत अपघात घडतात.

न्यायालाच्या बंदीमुळे काही वर्ष या शर्यती झाल्या नाहीत. बैलगाडी शर्यत घेण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यामुळे शर्यती होऊ लागल्या. त्यामुळे बैलगाडी शर्यत आयोजनाचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर बैलगाडी शर्यतींमध्ये  अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. अलिबाग, मुरुड आणि कर्जत तालुक्यात स्पर्धे दरम्यान बैलगाडी उधळून प्रेक्षकात घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यात यापुर्वीही दोघांचा मृत्यू झाला आहे. अलिबाग वरसोली येथील उमेश वर्तक आणि उक्रुळ येथील दौलत देशमुख यांचा अशाच दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला होता.

अलिबाग येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. बैलगाडी स्पर्धेत प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेतलेली नसते. हा आता मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. बैलगाडी स्पर्धेची धावपट्टी 1 हजार मीटरपेक्षा मोठी नसावी, ही धावपट्टी तीव्र उतार, दगड अथवा खडक असलेली नसावी, दलदल, चिखल आणि पाणथळ जागा नसावी, रस्त्यावर अथवा महामार्गावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊ नये, स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची व्यवस्था आयोजकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहीका उपलब्ध असणे आवश्यक आहे. शर्यतीच्या वेळी धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे उभारणे अथवा सुरक्षेचे उपाय करणे अपेक्षित आहे. या आटी आहेत. त्याचे पालन आयोजक करत नाहीत. प्रशासन देखील त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे या दुर्घटन घडतात.

या अपघातांना केवळ आयोजकच जबबदार असतात असे नाही. स्पर्धेदरम्यान बैलगाडी वेगाने पळविण्याच्या नादात बैलांवरील गाडीवानाचे नियंत्रण सुटते. त्यामुळे बैल भरकटतात. ते धावत सुटतात. आसपास उभ्या असलेल्या प्रेक्षकांना चिरडतात. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. अति उत्साही प्रेक्षक अगदी जवळ जातात. त्यामुळे अपघात होतो. काहीवेळा गाडी हाकणार खाली उतरून पुन्हा गाडीवर चढण्याचा प्रयत्न करतात. या प्रत्नात देखील अपघात होतात.

दुर्घटनेनंतर पोलीस आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवतात. पण स्पर्धेत दुर्घटना होऊ नये यासाठी आयोजक, प्रशासन, स्पर्धक व प्रेक्षक या सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. बैलगाडी शर्यतीत जिल्ह्यात दुर्घटना घडत आहेत. चार जणांचा जीव आत्ता पर्यंत गेला आहे. त्यामुळे या घटनांबाबत  गांभिर्याने विचार करून निर्णय  घेण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाने आता कडक पावले उचलली पाहिजेत. प्रशासनाची परवानगी नघेता  अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणार्‍या बैलगाडी शर्यती  पोलीस आणि महसुल प्रशासनाने थांबवल्या पाहिजेत. न्यायालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केली आहे किवा नाही हे पाहूनच शर्यत सुरु करण्यास परवानगी द्यावी. प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत आयोजकांनी योग्य ती उपयोजना केली नसेल तर परवानगी देऊच नये.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply