महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात गुरुवारी (दि. 16) गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये ढग दाटून आले आणि गारांचा पाऊस पडला. यामुळे कामावरून सुटलेल्या कामगारांना आणि रस्त्यावरील वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत विक्रीस बसलेल्या विक्रेत्यांचेदेखील हाल झाले.
महाड तालुक्यात किल्ले रायगड परिसर, महाड शहर, दासगाव खाडी पट्टा आदी भागात पावसाच्या सरी तसेच गारा पडून जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे आंबा व्यावसायिक, शेतकरी तसेच वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …