Breaking News

पनवेलमधील पाले खुर्द, ढोंगर्‍याचा पाडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील पाले खुर्द आणि ढोंगर्‍याच्या पाड्यात सुमारे तीन कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले. त्यामुळे तेथील नागरिकांना त्या त्या सुविधा मिळणार आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार भाजपच्या पाठपुराव्यामुळे पाले खुर्दमध्ये पावसाळी गटार आणि रस्त्यांचे डांबरीकरणाचे दोन कोटी 45 लाख 36 हजार 194 रुपये खर्चून, तर ढोंगर्‍याच्या पाड्यात एमआयडीसी रोड कंपनी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गटार बांधण्याचे विकासकाम एक कोटी 47 लाख 29 हजार 447 रुपये खर्चून केले जाणार आहे. या विकासकामांचा शुभारंभ भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी कामांचा दर्जा चांगला राखण्यासाठी ग्रामस्थांनीही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, राम पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, प्रभाग 2चे अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील, गौरव भोईर, महेश पाटील, अशोक साळुंखे, श्रीनाथ पाटील, पवन भोईर, हरिशेठ फडके, ज्ञानेश्वर ढोंगरे, सागर भोईर, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, रोशन ढोंगरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply