Breaking News

अवैध मद्यसाठा जप्त

पनवेल ः वार्ताहर –  राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक भरारी पथक क्र. 2 पनवेल यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे घर नं. 59 अ, मधली आळी, पोटदुखी माता मंदिराजवळ, कोप्रोली, ता. पेण, जि. रायगड येथे छापा मारला असता गोवा राज्यनिर्मित अवैध मद्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी हेमलता शशिकांत म्हात्रे (43) या महिलेस जागीच अटक करून 59 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा राजेंद्र वर्मा (अंमलबजावणी व दक्षता), विभागीय उपआयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. गोगावले, आनंद पवार, एस. एस. गायकवाड, ए. सी. मानकर, नीलम घुट्टे तसेच पालवे, सुधीर मोरे, मायाक्का मोरे, संदीप पाटील, हाके यांनी सहभाग घेतला. सोबत मनोज भोईर व अनंत जगदाडे यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. सी. मानकर करीत आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply