Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा देवदमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर यांचा रॅलीत सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवद ग्रामपंचायत येथे भाजप महायुतीच्या उमेदवारांचा मंगळवारी (दि. 31) प्रचार करण्यात आला. त्यास मतदारांचा प्रतिसाद लाभला.
या निवडणुकीत भाजप महायुतीच्या वतीने थेट सरपंचपदासाठी विनोद वाघमारे; तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून चंद्र वाघमारे, कुंदा वाघमारे; प्रभाग 2मधून विजय वाघमारे, साधना वाघमारे; प्रभाग 3मधून संदीप वाघमारे, दिनेश वाघमारे; प्रभाग 4मधून करुणा वाघमारे, संदीप वाघमारे उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचार रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे, वामनशेठ वाघमारे, निलेश वाघमारे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, दिनेश वाघमारे, विनोद वाघमारे, संदीप वाघमारे, सचिन वाघमारे, सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन केणी, कैलास वाघमारे, राजू ठोकळ, शशिकांत वाघमारे, संजय वाघमारे, अरुण वाघमारे, मंगेश वाघमारे, विजय वाघमारे, भगवान भंडारी, वासुदेव वाघमारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply