Breaking News

सुदेश दळवी यांना पुरस्कार प्रदान

पनवेल : येथील उद्योजक दलितमित्र सुदेश दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने नुकताच श्रमरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पनवेलमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात झालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात राज्याच्या सांस्कृतिक विभागातील कक्ष अधिकारी बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते दळवी यांना श्रमरत्न सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अबरार मास्टर यांची नियुक्ती

पनवेल : शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्या आदेशानुसार संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून येथील अबरार फारुख मास्टर (कच्छी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अबरार मास्टर यांनी यापूर्वी शिव वाहतूक सेनेचे उपशहर प्रमुख म्हणून काम केले आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याची पनवेल महानगरपालिका क्षेत्र उपशहर संघटकपदी नियुक्ती झाली होती. शिव वाहतूक सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अबरार मास्टर (कच्छी) यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply