पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा समावेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीच्या वतीने पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी (दि.4) दाखल केले. महायुतीकडून भाजप युवा नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, दिनेश खानावकर तसेच शिवसेनेचे अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांनी आपले अर्ज महापालिकेचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे सादर केले.
महायुतीचे उमेदवार अनुभवी व अभ्यासू असून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, शिवसेना नेते रमेश गुडेकर, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंझारराव, युवा नेते संजय जैन यांच्यासह इतर उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजप महायुतीने वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह महापालिकेत पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. त्या अनुषंगाने महापौरपदी नितीन पाटील, तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील विराजमान झाले.
सार्वत्रिक निवडणुकीत 59 जागांवर विजय मिळाल्यामुळे सातपैकी पाच स्वीकृत नगरसेवकपदे महायुतीच्या वाट्याला आली आहेत. त्यामध्ये सभागृहाचा अनुभव व अभ्यास असलेले परेश ठाकूर, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत यांच्यासह अ‍ॅड. प्रथमेश सोमण आणि दिनेश खानावकर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज बुधवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले. निर्वाचित 59 आणि स्वीकृत पाच असे एकूण 64 संख्याबळ महायुतीचे होणार आहे.

Check Also

Test post title

Test post content

Leave a Reply