नवी मुंबई : बातमीदार
रेल्वेवरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. म्हणून ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूरकडे जाणार्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणार्या अप लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी अथवा नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …