Breaking News

प्रभाग क्रमांक 1मध्ये महास्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सोमवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत प्रभाग क्रामांक 1 मध्ये महास्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे झाले. या अभियानात पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष भोईर, यशवंत नेरुळकर, भगवान कोपरकर, संतोष पाटील, सचिन भोईर, पांडुरंग निगुडकर, हरिदास पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply