Breaking News

बोरघाटातील अपघातात 9 प्रवासी जखमी

खालापुर/खोपोली : प्रतिनिधी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोरघाटातून खोपोलीकडे येणारी मिनीबस बाजूला असणार्‍या दगडावर आदळून महामार्गावरच पलटी झाली. मुंबई -पुणे महामार्गावरील बोरघाटातील अंडापॉईंट परिसरात मंगळवारी (दि. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करणारे एक कुटुंब त्यांच्या मिनीबस (एमएच-01,टी-5975) मधून पुण्याहुन खोपोली बाजूकडे येत होते. बोरघाटातील अंडापॉईंटच्या काही अंतरावर गारमाळ मार्गाजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही मिनीबस  दगडावर आदळून महामार्गावरच पलटी झाली. या अपघातात  रेडीयेटरमधील गरम पाणी, ऑइल अंगावर पडल्याने सातजण भाजले असून, दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात

आले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply