नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातला अव्वल फलंदाज आहे. अवघे क्रिकेटविश्व त्याला रनमशीन म्हणून ओळखते. क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यालाही अनेक वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळेच तो आज टीम इंडियाचा ’कणा’ आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विराटला वारंवार संधी दिली, त्यामुळेच त्याचा आज दबदबा आहे, असे श्रीकांत म्हणाले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फार्मात आहे. त्याचा हा खेळ असाच राहिला तर विक्रमांच्या राशी तो रचेल, यात शंकाच नाही. सध्याचा आघाडीचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आगामी काळात तो शतकांच्या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडणार असल्याचं बोललं जात आहे. रनमशीन असलेला विराट कोहली यशोशिखरावर पोहचला आहे. त्याच्या यशाबाबत माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी प्रमुख श्रीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विराटला सुरुवातीच्या काळात वारंवार संधी दिली. त्यामुळेच तो आज क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की, आम्ही विराटला संघाकडून खेळण्याची वारंवार संधी दिली. त्यामुळे तो आज कुठपर्यंत पोहचला आहे. त्याला या ठिकाणी पाहून खूपच चांगलं वाटत आहे, असे श्रीकांत म्हणाले. कोहलीनं स्वतःला एक खेळाडू म्हणून वारंवार सिद्ध केलं आहे. आज तो क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवत आहे. विराटनं भारतीय संघाकडून खेळताना सातत्यानं धावा केल्या आहेत, असंही ते म्हणाले.