पेण : प्रतिनिधी
येथील सहयोग मानव जनजागृती संस्थेने काळंबादेवी मंदिरामध्ये शुक्रवारी पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका माधवी गवाणकर यांच्या मार्गदर्शनाने योगाभ्यास वर्ग आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी योग शिक्षिका माधवी गवाणकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना व्यायाम प्रकार व प्राणायामचे धडे दिले. चंद्रकांत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, मधुकर म्हात्रे, जनता हायस्कुलचे मुख्याध्यापक कांबळे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, दिनेश म्हात्रे, प्रकाश पाटील, ऋषिकेश कोठेकर, नवीन यादव, जयेश केणी, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील, सदानंद ठाकूर यांनी मेहनत घेतली. संदीप म्हात्रे यांनी आभार मानले.