Breaking News

स्व. पत्रकार वचन गायकवाड यांना सहकार्यांनी वाहिली श्रद्धांजली

पनवेल ः वार्ताहर

तळोजातील पत्रकार वचन गायकवाड यांनी अचानक एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने पनवेल तालुक्यातील पत्रकार एकवटले आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.

वचन गायकवाड यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह तळोजा परिसरातील औद्योगिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त करण्यात येत आहे. गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात पनवेलमधील सर्व पत्रकार सहभागी असून सामाजिक बांधिलकीतून अधिकाधिक मदत त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply