कर्जत : बातमीदारआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेरळ शहर शाखेच्या वतीने येथील बापूराव धारप सभागृहात शुक्रवारी सकाळी एक तास योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. नेरळमध्ये योगाचे वर्ग घेणार्या बंडू काळे यांनी उपस्थितांना योगाची प्रात्यक्षिके दिली.त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपचे शहर अध्यक्ष अनिल जैन यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper