
खारघर ः येथील पक्ष कार्यालयात पनवेल प्रेस क्लब आणि खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी संतोष वाव्हळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अभिमन्यू पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव घरत, समीर कदम, वासुदेव पाटील, राकेश गोवारी यांच्यासह मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.