Breaking News

‘शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे’

पुणे ः प्रतिनिधी

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर सरकार एकाच पक्षाचे असावे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थी शिक्षण घेऊन परीक्षेसाठी सज्ज होतात. शिक्षणव्यवस्था दरवर्षी परीक्षेचे पेपर सेट करत असते. हे करताना मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्य पहिले जात नाही. विद्यार्थी बुद्धिमत्ता आणि कौशल्य ओळखण्यास शिक्षणव्यवस्थाच नापास झाली आहे. याचा पूर्ण अभ्यास करूनच व्यवस्थेत बदल घडवून आणला पाहिजे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे. शिक्षणक्षेत्रात कला आणि जाहिरात क्षेत्रासारखे बदल व्हायला हवेत. सध्याच्या जाहिरातीमध्ये नात्यांना महत्त्व दिले जात नाही. जाहिरातीत महिला दाखवल्या जात असल्याने जाहिराती बघण्याचे प्रकार वाढले आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply