Breaking News

लग्नसोहळ्यात हवेत गोळीबार; डान्सर तरुणीचा मृत्यू

सहरसा ः वृत्तसंस्था

बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तीने बंदुकीने डान्सरवर पैसे उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र बंदुकीतून सुटलेली गोळी डान्सरला लागली आणि तिचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील सहरसा जिल्ह्यात बुधवारी रात्री 2च्या सुमारास झालेल्या गोळीबारात महिला डान्सरचा मृत्यू झाला. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्केस्ट्राची व्यवस्था करण्यात आली होती. नाइट क्वीन या ऑर्केस्ट्रात काम करणारी आकृती सिंह ऊर्फ मधू ही तिचा डान्स सादर करत असतानाच तिच्यावर पैशांची उधळण करण्यात आली, तसेच गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये मधूचा मृत्यू झाला. गोळी लागताच तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मधूचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply