तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडीओची मागणी

पुणे ः प्रतिनिधी

हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करणार्‍या संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअ‍ॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडीओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरून हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओ न पाठवल्यास खाजगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी तरुणीला देण्यात आली असून याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 24 वर्षीय तरुणी ही हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी तरुणीला व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. ‘तुझे खाजगी फोटो माझ्याकडे आहेत. मला ब्लॉक करू नकोस, जर ब्लॉक केलेस तर तुझे खाजगी फोटो मुंबईच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवणार,’ असे मेसेजमध्ये म्हटले होते. काही वेळाने त्याच क्रमांकावरून तरुणीचा मॉर्फ केलेला फोटोदेखील पाठवण्यात आला. हा फोटो तुझ्या मित्रांना पाठवणार आहे. असे नको असेल तर एका मिनिटाचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ मला पाठव. तो मी कोणाला दाखवणार नाही, असा मेसेजही पाठवण्यात आला. यामुळे संगणक अभियंता तरुणी घाबरली होती. शेवटी तरुणीने निगडी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपला व्हॉट्सअ‍ॅप असलेला नंबर किंवा नियमित वापरातील मोबाईल नंबर ठेवू नये. यामुळे अशा घटना टाळता येतील. तुमच्या सोशल नेटवर्कवर अनेकांचे लक्ष असते, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी सांगितले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply