Breaking News

नेरळमध्ये रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन

कर्जत : बातमीदार

नेरळ रेल्वेस्थानक आणि एसटी स्टॅण्ड येथून वंजारपाडा, देवपाडा भागात जाण्यासाठी नवीन तीन चाकी रिक्षांचा स्टॅण्ड सुरू करण्यात आला आहे. शिवशंकर रिक्षा चालक-मालक संघटनेच्या या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन गुरुवारी (दि. 25) पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे यांच्या हस्ते नामफलकाला हार अर्पण करून करण्यात आले. कर्जत पं. स. चे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या वेळी कोल्हारेचे उपसरपंच रामदास हजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला.

 रिक्षाचालकांनी शासनाने ठरवून दिलेल्या ड्रेस कोडवर कायम व्यवसाय करावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शेडगे यांनी या वेळी केले. दहिवली ग्रामपंचायत सदस्य कैलाश विरले, पोशिरचे माजी उपसरपंच लक्ष्मण शिनारे, पोलीस शिपाई समीर भोईर, निलेश वाणी, रिक्षा स्टॅण्ड अध्यक्ष दत्तात्रय मिसाळ, उपाध्यक्ष सचिन मुरबे, सचिव वाळकू मुरबे, तसेच निलेश माळी, दीपक भोईर, नारायण विरले, अरुण माळी, सखाराम तुपे, चंद्रकांत मिसाळ, तानाजी भवारे, संजय विरले आदी सदस्य या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply