पावसाळ्यात ओला चारा खाण्यासाठी वन्यप्राणी माळरानावर येत असल्याने त्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. शिकारी आपली मर्दानगी मुक्या प्राण्यांवर बंदुकीच्या साह्याने गाजवीत अनेक प्राण्याच्या हत्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कधी मांस भक्षणासाठी, तर कधी कातडीसाठी किंवा नखे यांच्यासाठी वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. सुधागड, पाली, खालापूर, तसेच कर्जतमधील जंगल भाग यासाठी अनुकूल समजले जाते. शिकारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, तसेच वनाधिकार्यांची व कर्मचार्यांची संख्या कमी असल्याचा शिकारी याचा गैरफायदा घेत असल्याचे सत्य समोर येत आहे. सुधागडात 3 मे 2019 रोजी खवले मांजर पकडल्याप्रकरणी वनाधिकार्यांनी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 5 मे 2019 रोजी पाली सुधागड येथे खवले मांजराची तस्करी करण्यातसाठी जंगलात आल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन अधिकार्यांनी पालीच्या जंगलात सात आरोपींना अटक केली होती.
पाली वाकण मार्गावर पिराचा माळ येथे मारुती व्हॅगन आर (क्र. एमएच 06 एसएस 1751)ची तपासणी केली. यामध्ये एक खवळे मांजर व त्याचे पिल्लू गुंडाळून ठेवले असल्याचे आढळले. या घटनेत अशोक वाघमारे (27, पंदेरी मंडणगड), शौकत नाशिर मोमीन (44), सुनील काशिनाथ माने (पोयनाड), चंद्रहास शंकर पाटील (49, डोलवी), नितीन पाटील (सानघर), संदीप दत्तात्रय हिलम (39, माणगाव), ज्ञानेश्वर पाटील (44, शेतजुई) यांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने या सात तस्करांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
खवल्या मांजराची तस्करीप्रकरणी कळवा ठाणे येथे सात आरोपींना अटक करण्यात आली होती. चंद्रपुरात एका खाजगी घरात खवले मांजर आढळून आल्याने वन विभाग सतर्क झाले होते. त्याच्या दुसर्या दिवशी नगरसेवक बाबा आझिम यांच्या घराशेजारी खवळे मांजर आढळल्याने बाबा आझिम यांनी स्थानिक वनाधिकार्यांना याची माहिती देत, खवले मांजर वन खात्याच्या ताब्यात दिले होते. ठाण्यात 24 फेब्रुवारी 2018 रोजी खवल्या मांजर विक्रीसाठी आलेल्या तस्करांना अटक करण्यात आली होती, तर 12 जुलै 2018 रोजी खवळे मांजरांची विक्री करीत असलेल्या तस्कराला पोलिसांनी अटक केली होती. तस्करांच्या माहितीप्रमाणे एका खवळे मांजराची किंमत 70 लाख ते एक कोटीचा आसपास असल्याचे सांगितले जाते. खवले मांजर तस्करांचे उखळ पांढरे करणारे साधन असून खवळे मांजराची तस्करी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खालापुरात 2019मध्ये नवी मुंबई येथील सिताराम मढवी याला रानटी डुकराची शिकार करताना तत्कालीन वनाधिकारी गोडबोले व कर्मचारी यांनी मुद्देमाल व चारचाकी स्कॉर्पिओसह खालापुरातील वणी-केळवली भागातील जंगलातून अटक केली होती.
शिकारीसाठी वापरलेले वाहन जप्त करून शासन जमा केले होते. याप्रकरणी सीताराम मढवी यांच्यासह 50 अज्ञात शिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायगडात या अटकेने खळबळ माजली होती. अटक केलेले आरोपी सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्याच्या विरोधात केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरला होता. कर्तव्यनिष्ठ वन क्षेत्र अधिकारी गोडबोले यांनी वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी आरोपी किती मोठा व राजकीय आहे याची तमा बाळगता कारवाई केली होती. या खटल्याचा निकाल स्थानिक न्यायालयात आरोपीच्या बाजूने लागला असला, तरी या विरोधात शासनातर्फे उच्च न्यायालय अपील करण्यात आले आहे. अज्ञात 50 शिकारी हे अद्याप फरारी असून त्यांचा सुगावा लागत नसल्याने वनविभागाच्या तपास कार्यावर शंका व्यक्त केली जात आहे. मे 2018 मध्ये मानपाडा डोंबिवली पोलिसांनी चौक खालापूर येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून बिबट्याची कातडी विक्रीस आलेल्या दोन आरोपींना अटक केली होती. हे दोन्ही आरोपी चौक खालापूर गावातील होते. बिबट्याची शिकार करणारा आरोपी तुकाराम होला माथेरानच्या पायथ्याशी असणार्या आदिवासी वाडीतील असून जंगल भागातून शिकार केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. मागील आठवड्यात कल्याण गुन्हे शाखेने काटई परिसरात वाघाचे कातडे व खवले मांजराची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्याने सपाला रचून सनी कुशल शिंदे (20, जुई पेण), अनिकेत प्रसाद 22 जयदीप चोगले (27, सर्व रा. पेण) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 9 खवळे मांजर, 1 वाघाची कातडी तर पिस्तूल असा ऐवज हस्तगत केला होता. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात बिबट्याची कातडी 10 लाख, तर वाघांची कातडी 25 ते 30 लाखांच्या किमतीला विकली जात असल्याचे समोर आले आहे.
वन्यजीवन अधिनियम 1972 च्या वन्य जीवाची अवैधरीत्या शिकार करणार्यांना किंवा त्यांच्या हाडामांसाला, तसेच कातडीच्या व्यापाराला या कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. 2003 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात येऊन तीन वर्षे शिक्षेऐवजी सात वर्षाची सजा व 25 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. जगात सर्वात जास्त तस्करी खवले मांजराची केली जाते खवल्या मांजराची त्वचा वेगवेगळ्या विकारांवर रोगांवर गुणकारी असल्याचे सांगितले जाते. चीन देशात खवले मांजराचे मांस विशेष पसंतीने खाल्ले जाते. मागील 10 वर्षात सात हजार खवळे मांजराची शिकार झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर मागील 12 वर्षात 450 वाघांची शिकार झाल्याचे वनविभागाचे मत आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. राज्यात 203 वाघ व 100 बछडे वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू असताना शिकार व तस्करी होत असल्याने वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न ऐरणीवर अल्ला आहे. महाराष्ट्रात 37 अभयारण्य आहेत. त्यासाठी 60 चौरस किमीचे जंगल राखीव ठेवण्यात आले आहे, मात्र चोरटी शिकार व तस्करी या वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. यामध्ये आदिवासी शिकारी ते नटनट्यांच्या पासून राजकारणीही सहभागी असल्याने वन्यजीव रक्षण हा चिंतेचा विषय ठरत आहे.
सलमान खानला 27 सप्टेंबर 1998 रोजी जोधपूरच्या भडगाव गावाच्या हद्दीत काळी हरीण शिकार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस घडलेल्या घटनेने देशात खळबळ माजली होती. या खटल्यात 27 फेब्रुवारी 2007ला न्यायालयाने सलमान खानला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची सजा सुनावली होती. या विरोधात सलमान खानने राजस्थान हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. 25 जुलै 2017 मध्ये याप्रकरणी सलमान खानला दोषी ठरविण्यात आले होते. सलमान खान विरोधात आरम अॅक्टचा ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमानकडे असणार्या हत्याराची मुदत 22 सप्टेंबर 1998 रोजी संपली होती. हा गुन्हा 5 ऑक्टोबर 1998 साली काळी हरीण शिकारी मामल्यात दाखल करण्यात आला होता. त्याच्याबरोबर सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, नीलम कोठारी, दुष्यंत सिंह, तब्बू व अन्य पाच आरोपींना या गुन्ह्यात सामील करण्यात आले होते. या गुन्ह्याचा निकाल जोधपूर न्यायालय 11 मार्च 2019 रोजी देण्यात आला. सलमान खान व्यतिरिक्त सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आले तर सलमान खानला पाच वर्ष सक्तमजुरी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 1998 मध्ये सुरू असणारा खटला तब्बल 20 वर्ष चालला. सलमान खानला दोषी ठरविण्यात आले 30 ऑगस्ट 2007ला राजस्थान हायकोर्ट हरीण शिकार मामल्यात पाच पाच वर्षाची सजा सुनावली होती. याप्रकरणी या वेळी सलमान खान तब्बल सात दिवस जोधपूर जेलमध्ये अटक होता. 24 जुलै 2012ला हायकोर्ट काळे हरी शिकार मामल्यात सर्व आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून घेतले जुलै 2019 रोजी सलमान खानला पाच वर्षे सजा ठोठावण्यात आली होती. 2 ऑक्टोबर 1998ला बिश्णोई समाज यांनी सलमान खान सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, दुष्यंत सिंह या हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेस जोधपूरजवळ काळ्या हरणांच्या शिकारीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-अरूण नलावडे, फिरस्ती