नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयसीसीने शनिवारी (दि. 30) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुसर्या व मार्नस लाबुशेन तिसर्या स्थानावर आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना बढती मिळाली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीनुसार केन 919 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील द्विशतकाने केनला प्रथमच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचवले. स्मिथने टीम इंडियाविरुद्ध सिडनी कसोटीत शतकी खेळी केली आणि त्यामुळे तो 891 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. लाबुशेन 878 गुणांसह तिसर्या, तर विराट 862 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे एकेक स्थान वर सरकले आहेत. पुजारा 760 गुणांसह सहाव्या, तर अजिंक्य 748 गुणांसह आठव्या स्थानी आला आहे. टॉप टेन फलंदाजांमध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …