Breaking News

अनलॉक-4 : देशात मेट्रो सेवा सुरू होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या अनलॉक-4साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राने हिरवा कंदील दर्शविला आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून मेट्रोगाड्या धावतील. अनलॉक-4मध्ये सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, तर शाळा-महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे कंटेन्मेंट झोन वगळता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कुठेही लॉकडाऊन घोषित करू शकत नाही. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊन घोषित करायचा असल्यास आधी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply