Breaking News

खोपोली येथील सह्याद्री शाळेत संगणक लॅब व प्रणालीचा शुभारंभ

खोपोली : प्रतिनिधी

केटीएसपी मंडळाच्या पुढाकाराने खोपोली शीळफाटा येथे सह्याद्री माध्यमिक विद्यालय संलग्न इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. गुरुवारी (दि. 26) या शाळेत संगणक कक्ष, संगणक लॅब व ई-लर्निंगसाठी संगणक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल, कार्यवाह किशोर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना रिठे व शाळेचे मुख्याध्यापक गौरव तिवारी यांच्या नियोजनातून हा संगणक प्रणालीचा शुभारंभ कार्यक्रम झाला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply