मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान झाले. यंदा मतदारांमध्ये तितकासा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला, मात्र काही ठिकाणी पाऊस नसतानाही मतदारांनी निरुत्साह दाखवला. त्यामुळे एकूणच मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे 55.31 टक्के मतदान झाले. तुरळक घटनांचा अपवाद वगळता राज्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सेलिब्रिटींनीही मतदान केले. गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …