Breaking News

रायगडात सुमारे 65.57 टक्के मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघात एकूण सुमारे 65.57 टक्के इतके मतदान झाले. तुरळक प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत झाली.

सुरुवातीला मतदानाचा वेग कमी होता, परंतु सकाळी 10 नंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 7 ते 9 या सुरुवातीच्या दोन तासांत 6.50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 11 वाजेपर्यंत 17.67 टक्के, 1 वाजेपर्यंत 32.97 टक्के, तर 3 वाजेपर्यंत 46.13 टक्के मतदान झालेे. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारीची जुळवाजुळव सुरू होती.

-मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

पनवेल : 56.00

उरण : 73.00

कर्जत : 69.00

पेण : 66.00

अलिबाग : 69.00

श्रीवर्धन : 61.00

महाड : 65.00 एकूण : 65.57

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply