Breaking News

पेणमध्ये कोरोनाचा वाढता कहर, 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यात कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत चालली आहे. जुलै महिन्याच्या 10 दिवसांतच कोरोना संसर्गामुळे जवळपास 27 रुग्णांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत असून नगरपालिका, पोलीस तसेच आरोग्य प्रशासनावर ताण येत आहे. पेण तालुक्यात 24 जूनला एका दिवसात 100च्या वर रुग्ण आढळून आले होते. रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्णांची संख्या आता 10,513च्या उंबरठ्यावर पोहचली आहे. काही दिवसांपूर्वी निर्बंधांत शिथिलता आणूनही पेणकरांकडून कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. बाजारपेठांमध्ये होणार्‍या गर्दीमुळे रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जुलैच्या 10 दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 269 एवढी झाली. वाढती कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण पाहता पेण नगरपालिका, पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply