Breaking News

उरणचा 74 वर्षाचा धावपटू थायलंडमध्ये धावणार

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील नागाव मांडन आळी येथे राहणार 74 वर्षाचा तरुण प्रभाकर दामोदर ठाकूर हे येत्या शुक्रवारी (दि. 7) मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत. त्यासाठी त्यांचा कसून साराव सुरू आहे.

भारतात, तसेच विदेशात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन पदके मिळवली आहेत. 2007 मध्ये मलेशियात 1,,2, 3 क्रमांक मिळविले आहेत, न्यूझीलंडमध्ये 2017 साली 10 हजार मीटर, पाच हजार मीटर, 1500 मीटर, 400 मीटर, 100 मीटर व 400 मीटर अशा विविध स्पर्धेत अनेक क्रमांकांवर बक्षिसे मिळविली आहेत. इंडिया मास्टर्स अ‍ॅथॅलेटिकने दिलेल्या पत्रानुसार  ते शुक्रवारी (दि. 7) थायलंड येथे जाणार असून तेथे 10 किमी, 5 किमी, दीड किमी, 800 मीटर, 400 मीटर आदी स्पर्धेत भाग  घेणार आहेत. यासाठी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply