Breaking News

आयपीएलमध्ये प्रेक्षकांना कार जिंकण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी

यंदाच्या आयपीएलमध्ये एखादा सामना पाहायला जाणार असाल, तर तुम्हाला एक एसयूव्ही जिंकण्याची संधी आहे. या वर्षी टाटातर्फे हॅरियर कॅच स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट झेल घेणार्‍या प्रेक्षकाला टाटाची हॅरियर एसयूव्ही मिळणार आहे.

आयपीएलच्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी षटकार ठोकले की प्रेक्षक त्याचा एका हाताने झेल घ्यायचे. या दर्शकांच्या कॅचचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. त्यामुळेच आयपीएलच्या 12वा सीझनमध्ये टाटाने हॅरिअर कॅच स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेंतर्गत एखाद्या प्रेक्षकानं झेल टिपल्यास त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळेल, पण हा कॅच एका हाताने घ्यावा लागेल. संपूर्ण सीझनमध्ये जो झेल सर्वोत्कृष्ट असेल, त्याला हॅरियर एसयूव्ही मिळणार आहे. ही एसयूव्ही कोणाला मिळते याबद्दल उत्सुकता आहे. आयपीएल स्पर्धा येत्या 23 मार्चला सुरू होणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रंगणार आहे. लोकसभेच्या निवडणुका असतानाही प्रथमच ही स्पर्धा पूर्णपणे भारतात खेळवली जाणार आहे.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply