Breaking News

भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जनता विद्यालयास पाच लाखांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा सुवर्ण महोत्सवी (50वा) वाढदिवस अजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार, वह्या वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शनिवारी (दि. 6) साजरा करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी जनता विद्यालयाच्या विकासासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान, वाढविसानिमित्त वारदोली येथील विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्थेच्या मुलांना धान्याचे वाटप आणि वारदोली गावात वृक्षारोपणही करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच जनता विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन असलेले राजेंद्र पाटील यांनी 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जनता विद्यालय तसेच कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, गरीब आणि गरजू मुला-मुलींना शालोपयोगी साहित्याचे वाटप, पळस्पे जिल्हा परिषद विभागातील आशा वर्कर्सचा सत्कार, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांचा सत्कार तसेच त्यांना छत्री वाटप आणि घंटागाडी कामगारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजप अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, भिंगार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश लहाने, सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश पाटील, कोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल गाताडे, अमित पाटील, जनता विद्यालय स्कूल कमिटी सदस्य गोविंद पाटील, नाना भागीत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लाखांबले, आप्पा भागीत, सूर्यकांत पाटील, महेश मोकल, मुख्याध्यापक सुरेश ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त आपल्याला जो आनंद मिळालाय तो आनंद इतरांना कसा देता येईल या दृष्टिकोनातून राजेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अनेक मान्यवरांनी पाटील यांचे अभीष्टचिंतन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply