Breaking News

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे नितीश कुमार यांच्याकडून समर्थन

पाटणा : वृत्तसंस्था

कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल, तर कुणीही काय केले असते, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पाटणातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. राज्यात भाजपा-शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेले आहे, मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना भाजपपासून दूर झाली आहे. त्यामुळे 105 आमदार असूनही भाजपला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यात वेळेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पाठिंबा न मिळाल्याने शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. कोणत्याही पक्षाकडून सत्तेचा दावा न करण्यात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पटनामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांना महाराष्ट्रातील स्थितीविषयी विचारण्यात आले. त्या वेळी नितीश कुमार म्हणाले, मी याविषयी काय सांगू शकतो. कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम नसेल, तर अशा स्थितीत कोणीही काय करेल. आम्ही यासंदर्भात काहीही करू शकत नाही.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply