नाशिक : प्रतिनिधी
अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ गुरुवारी (दि. 14) सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. गुरुवारी सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. मुंबई विमानतळाहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.