नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पेण : प्रतिनिधी
रोटरी क्ल्ब ऑफ ओरायन यांच्या वतीने पेणमधील गांधी मंदिर येथे पैठणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 12) नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष पाटील यांनी पेणमध्ये पैठणी महोत्सव भरविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ ओरायनच्या सदस्यांना धन्यवाद दिले. रोटरीचे प्रांतपाल रवि धोत्रे, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, नगरसेविका तेजस्विनी नेने, रोटरी प्रेसिडेंट हेमंत शाह, सेक्रेटरी शैलजित चाफेकर, स्वाती मोहिते, डॉ. प्रसाद गोडबोले, आशिष झिंजे, पर्णल कणेकर, सुबोध जोशी, दर्शना कणेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. हा महोत्सव 15 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.