Breaking News

वीजचोरी : 14 लाखांची वसुली, ‘महावितरण’कडून दोन महिन्यांत 63 घटना उघडकीस

पनवेल ः बातबीदार

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाने मागील दोन महिन्यांपासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर 2019 मध्ये तब्बल 63 वीजचोरी उघडकीस आणून 14 लाख 51 हजार 250 रुपयांची वसुली केली आहे.

सातत्याने वाढत चाललेली वितरण हानी ही प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होणार्‍या वीजचोरीमुळे होत असल्याने भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण व पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल (ग्रा) विभागातील सर्व उपविभागांतर्गत वीजचोरी विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली आहे. वीज कायदा 2003 च्या कलम 135 अनुसार, या मोहिमेत  कर्जत विभागातील नेरळ, कळंब, दहिवली उपविभागात एकूण 15 चोरीचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये एकूण रु. 47,93,20 ची वीजचोरी आढळली असून रु.39,59,70 वसूल करण्यात आले आहे. तसेच खोपोली उपविभागामध्ये हाळ, खोपोली, वावोशी भागात 10 वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले यामध्ये एकूण रु.27,56,80 वसूल करण्यात आले. खालापूर उपविभागामध्ये आसरे,धारणी व लगतच्या गावामध्ये 7 वीज चोरीच्या प्रकरणात रु.84,990 वसूल करण्यात आले व पनवेल-2 उपविभगात आपटा, साई, चावणे, रिस व कोळखे इत्यादी गावांमध्ये सर्वाधिक 31 वीजचोरीचे प्रकार उघडकीस आले असून एकूण रु.67,46,10 वसूल करण्यात यश आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply