मुंबई ः प्रतिनिधी
सरकारने शेतकर्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे, मात्र ही शुद्ध फसवणूक आहे. सरकारने शेतकर्यांसाठी केलेली दोन लाखांची कर्जमाफी म्हणजे केवळ फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरून यू टर्न मारला. त्यामुळे यू टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटले पाहिजे, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.
प्रत्येक गोष्टीत ते यू टर्न मारतात. सत्तेत आल्यावर मर्यादा असतात हे मान्य, मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दोन लाखांची कर्जमाफी केली, पण 2001 ते 2016 या कालावधीतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिला नाही. आता फक्त दोन लाखांवरचे शेतकरी राहिले आहेत आणि त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणूक आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.
पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांची पक्षाबद्दल नाराजी नाही. ती एखाद्या व्यक्ती, घटना यांच्याबद्दल आहे. ही नाराजी एकत्र बसून मांडायची असते. आमच्या नेत्यांची काळजी आमचा पक्ष घेईल. त्यांना कोणी ऑफर देत असेल, तर त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांची काळजी करावी, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …